भविष्यातील दिशा : राष्ट्रवादी चिंतन शिबीर नागपूरमध्ये 19 सप्टेंबर रोजी

0
118

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे राष्ट्रीय चिंतन शिबीर एम्प्रेस पॅलेस वर्धा रोड येथे होणार आहे. या शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे, राज्याचे मंत्री  छगन भुजबळ आणि यांच्यासह देशभरातून प्रमुख नेते, सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, सेल अध्यक्ष आणि राष्ट्रीय पदाधिकारी असे 550 पदाधिकारी सहभागी होणार आहे. या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन केले जाणार आहे. पक्षाची आजवरची आणि भविष्यातील वाटचाल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील यश यावर सखोल चर्चा होणार आहे. सकाळी 10 वाजता ध्वजारोहणाने शिबिराची सुरुवात होईल आणि सायंकाळी 5 वाजता. त्याचा समारोप होईल.

प्रमुख मुद्दे:

निवडणुकीची तयारी: नागपूरसह संपूर्ण विदर्भात आगामी निवडणुकांमध्ये यश कसे मिळवायचे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

महायुतीबाबत चर्चा: स्थानिक पातळीवर महायुती करण्याबाबत पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले जाईल आणि त्यावर आवश्यक उपाययोजना सुचवल्या जातील. या चिंतन शिबिराची सुरुवात नागपूरमधून होत असून, यानंतर प्रत्येक विभागात अशाच बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्रजी जैन, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, प्रशांत पवार, तानाजी वनवे, विशाल खांडेकर, जानबा मस्के आणि नागपूर शहर व ग्रामीणचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.