spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान”च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा सराव पेपरचे आयोजन

गडचिरोली ता ३– * एक गाव एक वाचनालय अंतर्गत नोंदणी केलेल्या विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन एकुण 3750 विद्याथ्र्यांनी दिला सराव पेपर
* आतापर्यंत आठ टेस्ट सिरीजच्या माध्यमातून एकूण 27,950 विद्याथ्र्यांनी दिली परीक्षा
गडचिरोली जिल्ह्रातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्याथ्र्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत मागे पडत आहेत. करीता शालेय विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मंुबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत काही दिवसांनी सुरु होणा­या स्पर्धा परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर दिनांक 01/09/2025 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडु आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या 71 वाचनालयामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र. 08 चे आयोजन करण्यात आले होते.
या सराव पेपरचा उपयोग विद्याथ्र्यांना येणा­या पोलीस शिपाई भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेकरिता होणार आहे. यावेळी सदर स्पर्धा परीक्षा सराव पेपर करीता पोलीस मुख्यालय व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन एकूण 3750 विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्याथ्र्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र, पेनगुंडा हद्दीतील 25, पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील 10 व पोस्टे कवंडे हद्दीतील 02 विद्याथ्र्यांनीही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला. अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. पोलीस मुख्यालय परिसरात घेण्यात आलेल्या सराव पेपरमध्ये 1750 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. सदर सराव पेपरवेळी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी उपस्थिती दर्शवून विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे मनोबल वाढविले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.