spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तात्या टोपे नगर नागरिक मंडळ गणेशोत्सव समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

नागपूर १९ : तात्या टोपे नगर नागरिक मंडळ गणेशोत्सव समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त (५१वे वर्ष) दिनांक १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कशी तयार करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच पर्यावरण संवर्धनास चालना मिळावी हे होते. कार्यशाळेला सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मार्गदर्शनाचे कार्य प्रख्यात शिल्पकार  मोनल कोहाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागपूरचे प्रसिद्ध चित्रकार  विनोद कपले होते. त्यांचा सोबत  नागरिक मंडळाचे अध्यक्ष  नरेंद्र जोग, उपाध्यक्ष  संजय खांडवे  व सौ सुषमा ठावरे हे देखील मंचावर उपस्थित होते. गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक करत संपूर्ण नागपूर शहरात अशा कार्यशाळांचे आयोजन व्हावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचा यशस्वीते साठी विशेष परिश्रम श्रीया देशमुख, श्रेयस पंडे, ओंकार देशमुख, कौस्तुभ जोशी, सई आंभोरकर, सोहम जहागीरदार, करण भुरे, शौनक जहागीरदार, सौ. अदिती घुई,  सौ कल्याणी  जहागीरदार,  प्रथमेश राऊत व विक्रांत विश्वरुपे यांनी घेतले.

या कार्यशाळेतून नागपूरकरांना गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक व कलात्मक मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन समितीच्या सदस्यांनी केले.

Popular Articles