तिरोडा २१ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, घाटकुरोडा येथील पदवीधर विषय शिक्षक नोकलाल शरणागत यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदियाच्या मार्गदर्शनात राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र, पुणे करीता तयार केलेले इयत्ता सहावी हिंदी विषयातील ‘नदी कंधे पर’ या कवितेचे अध्यापन करतांनाचे शैक्षणिक व्हिडिओ राष्ट्रीय शैक्षणिक टीव्ही चॅनलवर व यूट्यूब चैनल वर व या यूट्यूब चैनल वर दिनांक 19.08.2025 रोजी सकाळी 04:05 वाजता प्रसारित झाले व सायंकाळी 04:51 वाजता पु:न प्रसारित झाले.
याव्यतिरिक्त त्यांनी तयार केलेले शैक्षणिक व्हिडिओ पुढेही प्रसारित होणार आहेत. अशीच अनेक विविध इयत्ता व विषयनिहाय शैक्षणिक व्हिडिओ DTH DD PM e-Vidya113,114,115,116,117 या टीव्ही चॅनलवर अथवा SCERTM113,114,115,116,117 या यूट्यूब चैनल वर पाहून विद्यार्थीआपली शैक्षणिक प्रगती साधू शकतील.शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची संधी दिल्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया चे शिक्षक नोकलाल शरणागत यांनी आभार व्यक्त केले आहे




