गोरेगाव पोलीसांची कारवाई : अवैध जनावर वाहतूक प्रकरणी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
46

गोरेगाव, प्रतिनिधी :- गोरेगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून अवैध जनावर वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या जनावरांची वाहतूक सुरू असल्याची खात्री पटली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान एक आयशर कंपनीचे मोठे वाहन (अंदाजे किंमत १५ लाख रुपये) अडवून तपासणी करण्यात आली.

तपासणीवेळी वाहनामध्ये एकूण २३ जनावरे (लाल, भुरकट व पांढऱ्या रंगाची) आढळून आली. या जनावरांची एकूण किंमत सुमारे २ लाख रुपये असून, वाहनासह एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या देखरेखीखाली पार पडली.

तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक सुजित घोलप, सहाय्यक फौजदार कंटीलाल धारणे, पोलीस हवालदार श्रीकांत धरगावे, शेखर सोनवणे तसेच पोलीस शिपाई अविनाश खरोले यांनी सहभाग घेतला.