spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोर्शी येथे रंगणार दहीहंडी निमित्त गोविंद पथकांचा थरार !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व  माजी आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवारातर्फे दहीहंडीचे आयोजन ! 
मोर्शी २५ :-  मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माजी आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवाराच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक शिंभोरा चौक मोर्शी येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दहीहंडीचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच यावेळी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश घरड यांनी दिली.
 माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जोरदार दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून मोर्शी तालुक्यातील नागरिकांना दहीहंडीचा थरार पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
      या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमदार सुलभा खोडके, उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, प्रमुख पाहुणे आमदार संजय खोडके, माजी आमदार देवेंद्र भुयार, राज्य कार्यकारिणी सदस्य बाळु पाटील कोहळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, विदर्भ प्रमुख  निखिल ठाकरे, हिरकणी महिला विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष डॉ. मोनाली देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अंकुश घारड, यांच्यासह मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिंभोरा चौक मोर्शी येथे अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, उच्च दर्जाची साऊंड सिस्टिम, भव्य स्टेज उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवाराच्या वतीने या कामाची नुकतीच पाहणी करण्यात आली असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
    दहीहंडी निमित्त गोविंद पथकांचा थरार पाहण्याची संधी मोर्शी तालुक्यातील नागरिकांना मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माजी आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.