spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

१०१ दीपांनी उजळला ग्रामपंचायत परिसर; सरपंच विशाल सेलोकर यांच्या पुढाकारातून ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम

किशोर साहू, मौदा :- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ हा प्रेरणादायी उपक्रम ग्रामपंचायत बोरी (घिवारी) येथे उत्साहात संपन्न झाला.

ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सरपंच विशाल मदन सेलोकर यांच्या पुढाकारातून १०१ दीप प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले. या सुंदर आणि भावनिक उपक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘आशीर्वादाचा दिवा’ हा केवळ दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम नसून देशसेवेप्रती कृतज्ञता, सेवाभाव आणि विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारा उपक्रम म्हणून ग्रामस्थांनी तो उत्साहाने साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘आशीर्वाद का दिया’ या उपक्रमाला स्नेहाची विशेष अभिव्यक्ती आणि भारताची अधिक समर्पणाने सेवा करण्याचा संकल्प दृढ करणारा भाव असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला, जनसहभागाला आणि सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणाला महत्त्व देत विविध क्षेत्रांत काम पुढे नेले जात असल्याचे त्यांच्या अधिकृत निवेदनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी जनतेने एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

गाव छोटं असलं तरी देशाच्या नेतृत्वाविषयीचा आदर आणि विकासाच्या संकल्पाची भावना मोठी आहे, हे १०१ दीपांच्या माध्यमातून बोरी (घिवारी) ग्रामस्थांनी दाखवून दिले.

या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना ग्रामस्थांनी सांगितले की, सरपंच विशाल सेलोकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून गावात सातत्याने नाविन्यपूर्ण, सामाजिक व जनहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. गावातील प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन कार्यक्रम आयोजित करण्याची त्यांची कार्यपद्धती या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आली.

यावेळी ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.“१०१ दीपांची ज्योत… सेवाभावाची वाट… आणि विकसित भारताचा संकल्प!” या प्रेरणादायी वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत देशसेवेचा हा संकल्प अधिक बळकट करण्याचा संदेश देण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.