खापा, १२ : पवित्र श्रावण मासनिमित्त खापा येथील श्री गोरोबा कुंभार समाज कमेटी मित्र परिवार नविन वस्ती खापा तर्फे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कावड यात्रेला सोमवार (दि.११ऑगस्ट) सकाळी ९ वाजता सर्वात झाली. ही यात्रा नविन वस्ती कुंभारपुरा ते हनुमान घाट, हनुमान घाट ते नविन वस्ती कुंभारपुरा येथे पोहोचली. आकर्षक महादेवाच्या भव्य झाकी सह शहराचे भ्रमण करीत कन्हान नदी पात्रातून जलकुंभभरून पदयात्रा करत खापा नवीन वस्ती येथील दुर्गा माता मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली.
सायंकाळी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर आयोजन करिता श्री गोरोबा कुंभार समाज कमेटी मित्र परिवार नविन वस्ती, व शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपने सहभाग घेतला




