खापा, १२ : जिजामाता विघालय व कनिष्ठ महाविद्यालय खापा येथे (दि. ११ ऑगस्ट) सोमवार ला ‘शालेय रक्षाबंधन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा सण साजरा केला. त्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य सुधाकर गजभिये तसेच प्रमुख अतिथी माजी सैनिक आर्मी तुळशीराम गिरगुसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश रोकडे आणि जेष्ठ शिक्षिका मुक्ता कडू उपस्थित होत्या. ज्या बहिणींना भाऊ नाही आहे अश्या बहिणींनी स्वतः राखी बनवून आणली आणि ती राखी बांधून रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला. तसेच शाळेतील प्रांगणातील वृक्षाला राखी बांधून त्याला जोपासण्याचे ऋणबंध बांधून विद्यार्थ्यांनी घेतले आणि पर्यावरणपुरक रक्षाबंधन साजरी करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी उमेश चौरे, राजेंद्र भोंगाडे, प्रफूल वडे, आनंद मेनकुदळे, भारती कुमरे, मुत्युंजय सिंग, पल्लवी धुव्वाधप्पार, शिला येनुरकर, सुमित्रा भारसाकरे यांनी खुप परीश्रम केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना मोहने आभार मुक्ता कडू यांनी मानले.








