Home Latest News रामटेक कृषी मेळाव्यात आदिवासी वीर बाबूराव शेडमाके यांच्या “जंगोम” नाटकाचे भव्य सादरीकरण

रामटेक कृषी मेळाव्यात आदिवासी वीर बाबूराव शेडमाके यांच्या “जंगोम” नाटकाचे भव्य सादरीकरण

0
60

 

रामटेक १२ – शुकवार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी रामटेक कृषी मेळाव्याच्या निमित्ताने नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस यांच्या वतीने पोलीस अधिक्षक मा. हर्ष ए. पोद्दार यांच्या पुढाकाराने मराठी रंगभूमीवर “जंगोम” या नाटकाचे भव्य सादरीकरण होणार आहे.

हे नाटक थोर आदिवासी कांतिकारक वीर बाबूराव शेडमाके यांच्या जंगोम सेनेचा इतिहास, सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील त्यांची गोंडवनातील लढाई आणि कांतीची मशाल पेटवण्याचा इतिहास उलगडते. तसेच, नाटक वर्तमानातील गोंडवनावर येणाऱ्या परकीय शक्तींच्या आव्हानांचा आढावा देखील घेते.

नाटकाचे लेखक प्रवीण खापरे असून, दिग्दर्शन शुभम निकम यांच्या कुशल हातून केले आहे. हे नाटक डॉ. दंदे फाऊंडेशन आणि हेमेंदू रंगभूमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केले जात आहे.

सदर दोन अंकी नाटकाचे सादरीकरण संध्याकाळी ६:३० वाजता, नेहरू ग्राऊंड, रामटेक येथे होईल. परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी नाटकाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे.