spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुन्हेशाखा युनिट ४ व नंदनवन पोलिसांची मोठी कामगिरी: जबरी चोरीतील आरोपींना अटक

 

नागपूर ११ : शहर गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक ४ आणि नंदनवन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीला गेलेला ऐशर ट्रक आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

७ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास विशाल परसराम वाहाने (४५, रा. कौशल्या नगर) हे त्यांचा ऐशर ट्रक (क्र. MH-31 CB-3197) घेऊन प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौक दरम्यानच्या पुलावरून जात होते. त्याचवेळी, त्यांच्या ओळखीचे दोन आरोपी रफीक काल्या आणि निसार यांनी डियो मोपेडवरून त्यांच्या ट्रकला आडवे येऊन थांबवले.

त्यांनी चालकाला दगड मारून शिवीगाळ केली आणि बळजबरीने खाली उतरवून सुमारे ४ लाख रुपये किंमतीचा ट्रक हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर विशाल वाहाने यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३०९ (६), ११५(२), ३५२, ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांची कारवाई

या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेशाखा युनिट क्रमांक ४ आणि नंदनवन पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि सापळा रचून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे रफीक खान वहीद खान (३७) आणि शेख निसार शेख काटीर (३६) असून, दोघेही मोठा ताजबाग, सक्करदरा, नागपूर येथील रहिवासी आहेत.

चौकशीदरम्यान, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली डियो मोपेड, एक मोबाईल फोन आणि चोरलेला ऐशर ट्रक असा एकूण सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सह. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

@filephoto

Popular Articles