spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ओबीसी क्रांती मोर्चाचा वर्धापन दिन आणि जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

भंडारा ११ : ओबीसींच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या ओबीसी क्रांती मोर्चाने आपला आठवा वर्धापन दिन आणि जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी, क्रांती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

२०१७ मध्ये ओबीसींसाठी जातनिहाय जनगणना, सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण, सोयी-सुविधा आणि शिष्यवृत्ती मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन ओबीसी क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली होती. याच उद्देशाने, वर्धापन दिनानिमित्त भंडारा शहरातील छोटा बाजार येथील वीर भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून, भंडारा जवळील गुंजेपार येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमासाठी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, महिलाध्यक्षा शोभा बावनकर, तालुकाध्यक्ष मनीषा भंडारकर आणि सुधीर सार्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.