नागपूर :- एच.एस.महात्मे संस्कार विहार स्कूल, रमा नगर येथे ग्रीन डे मोठ्या उत्साहात साजरा १८ जुलै रोजी करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा उद्देशाने विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यावेळी शाळेच्या परिसरात तसेच आजूबाजूच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर रमानगर परिसरातून पर्यावरण जनजागृतीवर विद्यार्थी आणि शिक्षिकांद्वारा शोभायात्रा काढण्यात आली. हिरव्या रंगाची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे आकर्षक फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. झाडे लावा, झाडे जगवा पर्यायवरण वाचवा भविष्य घडवा आपला परिसर स्वच्छ ठेवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या शोभायात्रेला परिसराचे नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक नागरिकांनी घरा बाहेर येऊन हात हलवून प्रतिसाद दिला.



