नागपूर :- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ॲड. मेश्राम यांनी वंदन केले. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणून स्वराज्याचे स्वप्न साकार केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोघलांशी लढा देत शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापणा करत हे रयतेचे राज्य उभारले. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देश आणि जगासाठी आदर्श आहे. अशा शब्दांत ॲड. मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.




