Home Latest News सोनेघाट कवडक (दुधाळा) येथे विकासकामाचे भूमिपूजन

सोनेघाट कवडक (दुधाळा) येथे विकासकामाचे भूमिपूजन

0
121

सचिन चौरसिया, रामटेक ११ : तालुक्यातील ग्रामपंचायत सोनेघाट कवडक (दुधाळा) येथील परमात्मा एक आश्रम दुधाळा परिसरात १५ लक्ष रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अँड. आशीष जयस्वाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी परमात्मा एकचे मार्गदर्शक जयराम महाजन, रामदास मथुरे, अध्यक्ष सुनील देवगडे, नगर परिषद रामटेकचे माजी सभापती बिकेंद्र महाजन, संजय येणुरकर, निलकंठ महाजन, नारायण कारामोरे, जितू वालोकर, देवा मेहरकुळे, नत्थु मानकर, रामदास मथुरे, हेमराज चांदेकर, माणिक चौधरी, दुष्यंत कारामोरे, सुषमा महाजन, इंद्रकला मथुरे, सुलोचना कारामोरे, वंदना येणुरकर,जीजा काटोले आदींसह परमात्मा एक आश्रम दुधाळा येथील संस्थेचे पदाधिकारी तसेच सेवक, सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते