भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन येथे सामूहिक सूर्यनमस्कार

0
44

नागपूर :- भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय नंदनवन येथे 23 जानेवारीला रथसप्तमी निमित्त स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक डॉ. योगेश तुलशान यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक सूर्यनमस्कार केले. सूर्यनमस्काराचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थी, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशस्वीरित्या विभाग प्रमुख डॉ.माधवी रेहपाडे, डॉ.ममता तलमले, डॉ. ओमप्रकाश गुल्हाने, डॉ. शरयू गजापुरे, डॉ.रुपाली भनारे व डॉ.स्नेहल भामकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ.युवराज काळे यांच्या मार्गदर्शनात हा आरोग्यदायी उपक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये योग व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत असून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.