spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज कोदामेंढी, खात येथे गाव भेट तर मौदा येथे जनसंवाद कार्यक्रम

किशोर साहू: मौदा, ता. ४: राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या 4 ऑगस्ट रोजी मौदा येथील राधाकृष्ण सभागृहात जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 यावेळी  नागरिकांची लेखी निवेदने स्वीकारतील. तसेच
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपातच (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मा. मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
 मंत्री महोदयांना भेटताना कोणीही, हार, पुष्पगुच्छ कुणी आणू नये. केवळ लेखी निवेदन स्वीकारली जातील.
दरम्यान मौदा तालुक्यातील गाव भेट कार्यक्रम अंतर्गत  दुपारी तीन वाजता तालुक्यातील कोदामेंढी येथे गर्देश्वरी मंदिराच्या सभागृहात गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहे. तर खात ग्रामपंचायत ला देखील भेट देणार आहे , मौदा येथील क्रीडा संकुलचे देखील यावेळी भूमिपूजन करणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, मौदा शहराध्यक्ष मोरेश्वर सोरते, तालुका महामंत्री तथा कोदामेंढी ग्रामपंचायत माजी सरपंच भगवान बावनकुळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर, खात ग्रामपंचायत सरपंचा माधुरी कैलास वैद्य सह समस्त तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यणांनी केले आहे.

Popular Articles