यवतमाळ ५ : संत परंपरेतील थोर संत, तत्कालीन भक्त परंपरेतील शैव-वैष्णव भेद मिटविणारे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री नरहरी महाराज मंदिर, विट भट्टी परीसर, तलाव फैल येथे श्रींचे मुर्ती चा विधीवत अभिषेक, पुजा व आरती करण्यात आली.
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या चरीत्राचे स्मरण करण्यात आले. तिर्थप्रसाद व काल्याचे वितरण करण्यात आले. सोनार समाज भवन येथे श्रींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या शिकवणीचा अंगीकार करण्याचा संकल्प समाज बांधवांनी केला. या कार्यक्रमाला सोनार सेवा महासंघ,संत नरहरी सोनार महाराज ट्रस्ट, सोनार कारागीर संघटना, भारतीय स्वर्णकार संघ चे पदाधिकारी सह सोनार समाज बांधव व भगीनी बहुसंख्येने उपस्थित होते.