हंसराज,प्रतिनिधी भंडारा तुमसर :- पालकमंत्री डॉ .पंकज भोयर हे येत्या रविवारी म्हणजे 22 मार्च रोजी तुमसर येथे जनता दरबारात नागरिकांच्या समस्या/निवेदन स्विकारणार आहेत.
जिल्ह्यांच्या स्तरावर नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांच्या निवारणासाठी (त्वरित तोडगा काढण्यासाठी) प्रत्येक सोमवारी तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित केले जातात. याद्वारे स्थानिक लोक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधल्या जातो.
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जिल्हयात जनता दरबार संकल्पना राबविली.भंडाऱ्यात संप्टेबर 2025 मध्ये पहिला जनता दरबार पालकमंत्री यांनी घेतला होता.त्यांनतर तहसील पातळीवर दर सोमवारी हा जनता दरबार राबविण्यात आला.त्याव्दारे अनेक समस्या कमी वेळेत मार्गी लागल्या.नागरिकांच्या समस्या स्वत भेायर तुमसर येथे स्विकारतील ,तरी नागरिकांनी काही समस्या असल्यास रविवारी जनता दरबारात सहभागी व्हावे ,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



