कामठी :- कामठी तालुक्यातील टेमसना येथे घरगुती चाचणी पद्धतीने सोयाबीन उगवण क्षमता तपासणी,बीज प्रक्रिया मोहीम व खरीप हंगाम पूर्व व खरिपातील प्रमुख पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारबाबत मोहीम घेण्यात आली. शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच बीज प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत( FIR) शेतकऱ्यांना सांगण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.खरीप हंगामातील प्रमुख पिकांबद्दल चर्चा व पीक लागवड नियोजन बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बेडवर पऱ्हे लागवड, हिरवळीच्या खताचा वापर व महत्व, बाबत समजावून सांगण्यात आले. सदर मोहीम प्रशिक्षणास अश्विनी साखरे (सहाय्यक कृषी अधिकारी ), स्वाती डेरे (समूह सहाय्यक ), यश भोयर (स्वयंसेवक ), ज्ञानेश्वर मोहोड, यशश्री भोयर, नेहा शहाणे, छाया राऊत ई. पुरुष शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.
टेमसना येथे प्रमुख पिकांच्या प्रसारबाबत मार्गदर्शन
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.