– घरी आलेल्या प्रगणकाला सहकार्य करावे-तहसिलदार गणेश जगदाळे
कामठी :- जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना हा दिनांक 16 मे ते 15 जून 2026 दरम्यान राबविन्यात येणार आहे त्यामुळे आपल्या घरी आलेल्या प्रगणकाला अचूक माहिती देण्यासाठी आपण सहकार्य करावे असे आवाहन कामठी चे तहसिलदार गणेश जगदाळे व मुख्याधिकारी विनोंद जाधव यांनी केले आहे.
त्याआधी स्वयंगनना टप्पा 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत पार पडला आहे.,देशातील अत्यंत महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या भारताची जनगणना 2027 प्रक्रियेला गती देण्यासाठी व्यापक जनजागृती राबविन्यात येत आहे.जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत होणारी ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्घतीने पार पडणार आहे.कामठी तालुक्यातील कामठी शहरासह प्रत्येक गावातील नागरिकांची जनगणना झाली पाहिजे यासाठी जनगणनेच्या या राष्ट्रीय उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.