spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ‘या’ 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर; असा असेल संपूर्ण कार्यक्रम

मुंबई :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली असून 18 जून 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 16 नियमित जागांसोबत नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचाही समावेश करण्यात आला आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

* अधिसूचना जारी : 25 मे 2026

* उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून 2026

* अर्जांची छाननी : 2 जून 2026

* अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : 4 जून 2026

* मतदान : 18 जून 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)

* मतमोजणी : 22 जून 2026

राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होत असून राजकीयदृष्ट्या या निवडणुकांकडे महत्त्वाच्या नजरेने पाहिले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीची ही रंगीत तालीम मानली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.