spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान येथे गुरू चे पुजन व आशिर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा थाटात साजरी

– माजी वर्गमित्र विद्यार्थी विकास हायस्कूल कन्हान, बॅच १९८०-८१ चे २१ व्या वर्षी आयोजन

कन्हान :- माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास हायस्कूल कन्हान, बॅच १९८०-८१ च्या वतीने २१ व्या वर्षी गुरूपेर्णिमेला गुरूपुजा, गुरू चे चरण स्पर्श करून आशिर्वाद घेऊन गुरूपोर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आली.

बालवयापासुन तर थेट १६ वर्षात, ओल्या मातीला आकार देऊन जगण्याचा मूलमंत्र आमची शाळा विकास हायस्कूल कन्हान या पुज्यनिय विद्येचा मंदिरातुन मिळाली. जिवनातील साठविलेल्या वर्गमित्रा च्या आठवणी, भावना, ओलावा, सर्वस्याचा अनंत ठेवा . म्हणुनच बुधवार (दि.२९) जुलै २०२६ ला सायंकाळी ५.३० वाजता गुरुपौर्णिमा या मंगलसमयी गुरुवर्याची, गुरुजनांची गुरुपुजा डोणेकर सभागृह मेन रोड कन्हान येथे २१ व्या वर्षी आयोजन करण्यात आले.”गुरु शिष्यां चे अतुट नाते हिच महाराष्ट्राची उत्तुंगस्थानी असलेली परंपरा आहे.” या सोहळ्याची सुरूवात विधीवत पुजा अर्चना करून गुरुजनांचा हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आली.

माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते देशमुख, धावडे, कोहळे, मालविये, पोतदार, खर्चे , बारई, खुर्गे,कोहळे, फरसोले, फुलबांधे, चिंचुलकर, मानधाते , पटले, भोयर  आदीं चे शाल, श्रीफळ, पुष्पहाराने स्वागत करून गुरूदक्षिणा म्हणुन संत श्रेष्ट तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गुरू शिष्याची मुर्ती भेट देऊन सत्कार करित आशिर्वाद घेण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, प्रेम रोडेकर, नरेश बर्वे यानी विकास हायस्कुल या आपल्या शाळेतुन प्राप्त शिक्षणा सोबत संस्कार आणि सर्व गुरूजनानी दिलेल्या ज्ञाना मुळेच आम्ही उत्तमशी प्रगती केल्याची कृतज्ञता व्यक्त करून शाळा व गुरूजनाचा गौरव केला.

बारई आणि पोतदार हयानी प्रकाश जाधव यांच्या पुढाकाराने सर्व माजी विद्यार्थी वर्गमित्र वर्ष २००५ पासुन दरवर्षी गुरूपोर्णिमेला आम्हा गुरूजना ना मानाने बोलावुन आम्हा गुरूजनांंचे स्वागत, सत्कार आणि उत्तम सेवा करून सर्वोत्तम भावनिक गुरू, शिष्याचे अतुट नाते जपत असल्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांना उज्वल, दिर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देत या हुदयस्पर्शी कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी थानेदार वैजयंती मंडवधरे, शाळा संचालक भुषणराव निंबाळकर, संस्था सचिव भरत साळवे, मुख्याध्यापक गिरजा शंकर यादव, मुख्याध्यापक राजेश खंडाईत, माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव, शांताराम जळते, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम मस्के, माजी सैनिक रवि रंग, प्रविण सचदेवे, माजी पोलीस गणेश खांडेकर, माजी उपसरपंच चंद्रशेखर कळमदार, पत्रकार मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, मोहन रंगारी, किशोर वासाडे, मोहम्मद शफी, ऋृषभ बावनकर, दिनेश नानवटकर, सामाजिक कार्यकर्ते नथुजी चरडे, कोठीराम चकोले, नेवालाल पात्रे, देवा चतुर, नगरसेविका रेखा टोहणे, माजी नगरसेविका राखी परते सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

विकास हायस्कूल माजी विद्यार्थी प्रमुख प्रकाश जाधव हयानी वयोवृध्द गुरूजनाच्या सदृढ आयुष्याची ईश्वर चरणी प्रार्थना करून आम्ही ६० वर्षाचे असुन शुध्दा वर्गमित्राच्या सुख, दु:खात नेहमी सहभागी होतो. आम्हच्या पाठीशी गुरूजन खंबीरपणे नेहमी असल्यां नेच हे या जन्मीचे “गुरुतीर्थच.” कार्यक्रमास गुरूजन, प्रतिष्ठीत मान्यवर आवर्जुन उपस्थित असल्या बद्दल सर्वाचे आभार व्यकत केले. सर्वानी स्नेह भोजनाचा आंनद घेत एकमेकांशी हितगुज साधत कार्यक्रमाची सांगता झाली. प्रास्ताविक व सुत्रसंचालन कमलेश पाजरे हयानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास हायस्कूल कन्हान बॅच १९८०-८१ चे प्रकाश भाऊ जाधव, विजय डोणेकर, कमलेश पांजरे, अशोक पोटभरे, गोविंद जुनघरे, प्रदिप वानखेडे, शंकर राऊत, प्रेम रोडेकर, मोरेश्वर उके, नथुजी लंगडे, दिलीप येलमुले, उमराव पाटील, सुनिल लाडेकर, प्रभाकर ताजने, सेवक माटे, जिवन लिल्हारे, सुधाकर सोनुले, ईश्वर कडबे, लता वंजारी, चंपा गजभिये, संघमित्रा खोब्रागडे, छाया भेलावे आदीनी परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.