किशोर साहू, मौदा ,ता. २० :- दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांत निमित्य अरोली येथील इंडियन पब्लिक स्कूल येथे उद्या मंगळवार (दि. 20 जानेवारी)ला सकाळी साडेअकरा ते चार वाजेपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कार्यक्रम होम मिनिस्टर चे युवा कलाकार रोशन हूकरे प्रमुख आकर्षण राहणार आहे. तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान ग्रामपंचायत अरोली सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी केले आहे.








