मनपातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन

0
42

नागपूर :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड यांनी मनपा मुख्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

ततपूर्वी शंकरनगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, नगरसेवक विनय दाणी, सुनील हिरणवार, विनोद कन्हेरे, श्रीकांत आगलावे, माजी नगरसेवक संजय बंगाले व देवेंद्र दस्तुरे, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, महासचिव अनिल देव तसेच पदाधिकारी व सदस्य सर्वश्री शिरीष दामले, बापू कांबळे, दिनेश खुरगे, संजय देशपांडे, राजेंद्र बेनोडेकर, भरत महाशब्दे, संजय कठाळे, नागेश टेंभेकर, मनपाचे .अमोल तपासे, राम मुंजे आणि दिनेश गावंडे यांनी पुष्पांजली अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन केले.