spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पटत नसेल तर खाते बंद करा – शाखा प्रबंधक

सचिन चौरसिया,रामटेक :- महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रामटेक येथील शाखेत प्रबंधकाचा मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित न देता … अरेरावी करत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार रामटेक येथील शाखेत होऊ लागला आहे. पटत नसेल तर खाते बंद करा असे उत्तर देतात. लहान कामांसाठीही कर्मचारी विलंब करतात. एका दिवसांत होणाऱ्या कामांसाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटी अन् सर्व्हर डाऊन असल्याचे व कर्मचारी नसल्याचे कारण देत वेळ मारून नेतात. याबाबत जाब विचारणाऱ्याचे काम करण्यास हेतूपुरस्सर उशिरा करण्याचा प्रकार बॅंकेत होत असल्याने खातेधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील वर्षी पासबुक प्रिंट साठी वाद झाला असून तेच परिस्थिती सोमवार (दि.६) ला माझ्या सोबत झाली. पासबुकवर प्रिंट देण्यास कारणे सांगत होते. अशा तक्रारी बँकेचे खातेदार असलेले शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक, बचत गट करीत आहेत. बँकेच्या या मनमानी कारभारामुळे अनेक ग्राहकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अश्या उद्धट बोलणाऱ्या व ग्राहकांना खाते बंद कर म्हणणाऱ्या प्रबंधकावर बँकेचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करेल काय ?

Popular Articles