spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

यवतमाळ शहराकरीता एकात्मिक टपाल वितरण केंद्राचे उद्घाटन

यवतमाळ ०८  – संपूर्ण यवतमाळ शहर व लगतच्या क्षेत्राकरीता एकात्मिक टपाल वितरण केंद्राचे उ‌द्घाटन आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी शोभा मधाळे पोस्ट मास्टर जनरल, नागपूर रीजन यांच्या हस्ते यवतमाळ मुख्य टपाल कार्यालय येथे करण्यात आले.
यवतमाळ शहर व लगतच्या ग्रामीण परिसरातील टपाल वितरण अधिक सुव्यवस्थित आणि जलद व्हावे या उ‌द्देशाने ही सुविधा राबविण्यात येत आहे. यामध्ये संपुर्ण यवतमाळ शहर व शहरालगतच्या वडगाव, लोहारा, भोसा, करळगाव या परिसरातील नागरिकांना त्यांचे नावे येणारी टपाल सु-व्यवस्थित व जलद वितरित व्हावी याकरीता या संपूर्ण क्षेत्राकरीता एकाच जागेवरून वितरण व्हावे व नागरिकांना संपर्क साधण्याकरीता सोयीचे व्हावे म्हणून यवतमाळ प्रधान डाकघर येथे एकात्मिक टपाल वितरण केंद्र आजपासून सुरु झाले आहे.
यावेळी मा. शोभा मधाळे पोस्ट मास्टर जनरल, नागपूर रीजन यांनी हिरवी झेंडी दाखवुन सर्व पोस्टमनला एकत्रितरीत्या टपाल वितरणा करीता रवाना केले. यामध्ये सर्व पोस्टमन आपल्या उपलब्ध वाहना‌द्वारे टपाल वितरण करतील आणि त्यांना याकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झालेल्या दराप्रमाणे इंधन भत्ता दिल्या जाईल. पर्यावरण संरक्षणाचा हेतु समोर ठेवुन ई- वाहनला प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगतांनाच ई-वाहन असणाऱ्या दोन पोस्टमनचे कौतुक सुद्धा करण्यात आले.
बदलत्या काळानुसार टपाल वितरण प्रक्रियेचे आधुनिकीकरण करतांना हि प्रक्रिया पोस्टमनच्या मोबाईल मधील विशेष अॅपद्वारे डिजीटल होईल व आपण पाठविलेल्या टपालाच्या वितरणाची संपूर्ण माहिती डिजीटल माध्यमाव्दारे सुनिश्चित होईल अशीही माहिती यावेळी
शोभा मधाळे पो पोस्ट मास्टर जनरल, नागपूर रीजन यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन निकम अधिक्षक टपाल विभाग यवतमाळ यांनी केले.  संजय मून, टपाल विमा विकास अधिकारी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन  विश्वेश मानकर सहाय्यक टपाल अधिक्षक (मुख्यालय) यांनी केले. या कार्यक्रमास दक्षिण उपविभाग यवतमाळचे टपाल निरीक्षक  कपिल घाटगे, उपविभाग वणीचे टपाल निरीक्षक  अशोक मुंडे तसेच  किशोर निनावे पोस्टमास्टर, मुख्य टपाल कार्यालय यवतमाळ तसेच कर्मचारी, वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी तथा ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.