spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती योजना सुरू

यवतमाळ :- प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांच्या मार्फत पारधी विकास योजनेअंतर्गत पारधी समाजातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येईल.

पांढरकवडा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, मारेगाव, वणी, केळापूर, झरी जामणी व घाटंजी या तालुक्यांतील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशित पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे दरमहा किमान 80 टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 700 रुपये तर इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती या प्रमाणे राहील.

विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते आहे किंवा पालकांसोबत संयुक्त खाते आहे, अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे नाव बँक पासबुकवर असणे आवश्यक असून बँक पासबुक व आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती जोडणे अनिवार्य आहे. मुख्याध्यापकांकडून प्रमाणित यादीनुसार विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाईल.

असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांनी कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.