विज पडल्याने शेतातच बैलाच्या जागीच मृत्यू घाटकुरोडा येथील घटना

0
60

अमरदिप बडगे, तिरोडा २९ :- तालुक्यातील घाटकुरोडा गावातील फागुदास विठुले यांच्या शेतामध्ये बैल जोडी गवताचा चारा  खात असतानाच अचानक मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आकाशातून वीज कडाडल्याने एका बैलाच्या अंगावर विज पडल्याने शेतातच बैलाचा मृत्यू झाला तर एक बैल थोडक्यात बचावला मृत झालेल्या बैलाची अंदाजे किंमत 50 हजार च्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे. याच शेतात धान पिकाची काम करत असलेल्या महिला देखील होत्या .त्या देखील थोडक्यात बचावल्या घटनेची माहिती होताच गावातील ग्रामसेवक सचिन कुठे ,तलाठी पटले पोलीस पाटील मुन्नालाल शेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली,   घटनेचा पंचनामा करून तहसील कार्यालयात पाठविण्यात आला