spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मॉयलच्या गुमगाव खाणीत ३७ व्या खान पर्यावरण व खनिज संवर्धन सप्ताहानिमित्त निरीक्षण

खापा, वार्ताहर :- मॉयल लिमिटेडच्या गुमगाव खाणीत शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी ३७ व्या खान पर्यावरण व खनिज संवर्धन सप्ताह २०२६-२७ अंतर्गत निरीक्षण कार्यक्रम पार पडला.

खनन कार्यादरम्यान पर्यावरणाचा समतोल राखणे, खनिज संपत्तीचा शाश्वत व जबाबदारीने वापर सुनिश्चित करणे तसेच कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात खाण व्यवस्थापक यू. एम. चरपे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून केली. यावेळी मोहन रहांगडाले (पथक प्रमुख तथा वरिष्ठ भूवैज्ञानिक, ईशान मिनरल्स), रामलिंगा राजू (खनन अभियंता, यूसीएल तथा पथक सदस्य) आणि उदय पोत्रु (खाण व्यवस्थापक, आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड तथा पथक सदस्य) उपस्थित होते.

या प्रसंगी खाण परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पर्यावरणीय निरीक्षणांतर्गत प्रदूषण नियंत्रण, जलव्यवस्थापन आणि हरित क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. तसेच खनिजांचा कार्यक्षम वापर, खनिज संवर्धन आणि खाणीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला. कर्मचाऱ्यांना कार्यस्थळावरील सुरक्षा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.

स्थानिक समुदायाचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जवाहर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य व नृत्य सादर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणातून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच मॉयल कर्मचारी अकील शेख यांनी आपल्या गीतातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

यावेळी मॉयल लिमिटेडच्या गुमगाव खाणीतर्फे यंदाच्या सप्ताहाची संकल्पना ‘सुदृढ संसाधने, स्मार्ट खनन, शाश्वत भविष्य’ या घोषवाक्याची पुनरुच्चार करून खनिज संपत्तीचे संवर्धन करताना वैज्ञानिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक खनन पद्धतींचा अवलंब करण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरण जपण्यासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हस्ते खान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमात गुमगाव खाणीतील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उत्पादनासोबतच पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची सामूहिक प्रतिज्ञाही यावेळी घेण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन स्नेहा तिवारी (वरिष्ठ व्यवस्थापक, भूविज्ञान) यांनी केले, तर आभार प्रदर्शन आकाश साहू (भूमिगत व्यवस्थापक, खनन) यांनी केले.

Popular Articles