सावनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून समस्या जाणून घेतल्या

0
3

सावनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या निर्देशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. राजाभाऊ टाकसाळे आणि संयुक्त जिल्हा महासचिव किरण झाडे यांनी सावनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. हा दौरा सावनेर शहराध्यक्ष गोपाल घटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.

यावेळी मंगसा, नरसाळा, नंदा, आजनी, केळवद व खैरी (ढालगाव) परिसरातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून सोयाबीन, संत्रा व कापूस पिकांची परिस्थिती, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई तसेच महिला शेतमजूर व युवक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या व निवेदनांची नोंद घेऊन त्यांच्या प्रश्नांवर शासन-प्रशासनाच्या स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक मदत व उपाययोजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात आली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणणे, हा पाहणी दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता.

या पाहणी दौऱ्यास जानबाजी मस्के, किशोर बेलसरे, किरण झाडे, प्रशांत ठाकरे, पुंडलिक राउत, सुरेंद्र वानखेडे, बाबा झाडे, महेश बोंद्रे, तुषार गायकवाड, लता वंजारी, अमोल डाहट, योगेश शर्मा, भोजराज घटे, अविनाश राउत, अरविंद भूते, कान्हा घटे, दिलावर शेख, भगवान रायकवाड, देवेंद्र माने, पुरुषोत्तम बारापत्रे व यामिनी मंडपे यांच्यासह शेतकरी बांधव, महिला शेतमजूर, युवक शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.