spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

AIIMS नागपूरमध्ये इंटर्न डॉक्टरची आत्महत्या; वसतिगृहात गळफास लावून घेतला जीव

 

नागपूर ५ – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नागपूरमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय डॉक्टरने वसतिगृहातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. संकेत पांडुराव डभाडे (वय २२, रा. जिंतूर, जि. परभणी) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत डभाडे यांनी एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर AIIMS नागपूर येथे इंटर्नशिप सुरू केली होती. शनिवारी रात्री त्यांना शेवटचं मित्रांनी पाहिलं होतं. मात्र रविवारी सकाळपासून ते खोलीबाहेर न आल्यामुळे मित्रांनी संशय व्यक्त करत वसतिगृह अधीक्षकाला याची माहिती दिली.

वसतिगृह अधीक्षकाने खोलीचा दरवाजा उघडल्यावर संकेत डभाडे यांचा मृतदेह बाथरुमच्या दरवाजाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याचे सांगितले आहे. मृत डॉक्टरचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Popular Articles