spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बी-१ टेंडर न काढताच केले १० लाखाचे काम; ग्रामपंचायतीचा कारभार

सखोल चौकशी करा: बंदिस्त नालीच निकृष्ट बांधकाम

ग्रामपंचायत शीतलवाडी (परसोडा ) स्वतः बनली कंत्राटदार

सचिन चौरसिया, रामटेक ५ :-  रामटेक तालुक्यातील शीतलवाडी (परसोडा) ग्रामपंचायतीच्यावतीने बंदिस्त (पाईप) नाली बांधकाम करण्यात आले असून ते अतिशय निकृष्ट असून अपूर्ण आहे. त्याचबरोबर बी-१ टेंडर न काढताच नालीचे ते बांधकाम करण्यात आले असल्याचा आक्षेप ग्रामस्थ करीत असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यार की नाही असे लक्ष लागले आहे.
रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत शितलवाडी अंतर्गत रामजी नगर येथील माता मंदीर ते सुभाष बर्वे यांच्या घरापर्यंत जनसुविधा विशेष अनुदान २०२३-२४ अंतर्गत १० लक्ष रुपयाचे बंधिस्त (पाईप) नालीचे बांधकाम सुरू आहे. परंतु नालीच्या कामात होत असलेल्या बोगस बांधकामामुळे नागरिक त्रस्त आहे. याबद्दल परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार तोंडी तक्रार करूनही याकडे लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बंदिस्त नालीच्या बांधकामाकरिता ग्रामपंचायतीने कोणतेही बी-१ टेंडर न करता ग्रामपंचायत प्रशासन हे काम स्वतः करीत आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायत अंदाजपत्रकानुसार काम न करता आपल्याच मन-मर्जीने काम करीत असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रामटेकचे अभियंता बनकर यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे अभियंता बनकर व सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात झालेल्या भूमिगत नालीच्या बांधकामाची सखोल चौकशी करून गुणवत्तापूर्ण काम आढळून न आल्यास दोषींवर कारवाई करणार की बाकी प्रकरणासारखे हा प्रकरणदेखील दडपण्यात येईल ? हे पाहण्याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

उपअभियांतांनी दाखवाला ग्रा. वि. अधिकांर्‍याकडे बोट

नालीच्या बांधकामात होत असलेल्या अनियमततेबाबत विचारणा व माहिती मिळविण्याकरिता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रामटेक येथे गेले असता उपअभियंता बनकर यांना नालीच्या कामात होत असलेल्या अनियमितताबाबत विचारना केली असता त्यांनी आपले हात वर करीत ग्रामविकास अधिकारी यांचेकडे बोट दाखविला. कोणताही पत्रकार आपल्या जीवाची परवा न करता लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून लोकहितासाठी नेहमी धावपळ करीत असतो. परंतु अधिकाऱ्यांचे असे उत्तर योग्य आहे काय.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.