spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सर्पदंश झाल्यावर कुठल्याही भोंदूबाबा किंवा जडिबुटी चा उपचार न घेता वैद्यकीय उपचार घ्यावा-तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोटे

सर्पदंशाने होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी कार्यशाळा
कामठी ता ५ :- विविध प्रजातींच्या सापाविषयी माहितीचा अभाव आणि सर्पदंश झाल्यावर नेमके काय करावे यासंदर्भात माहिती नसल्याने बऱ्याचदा सर्पदंश झाल्यावर बरेच जण वैद्यकीय उपचार न घेता भोंदूबाबा वा जडिबुटी उपचाराला प्राधान्य देत असल्याचे ऐकिवात येते तेव्हा आजच्या स्पर्धात्मक व शैक्षणिक युगात कुणालाही साप चावल्यास कुठल्याही भोंदू बाबा कडे न जाता व जडिबुटी ची औषध न घेता  प्रथमता वैद्यकीय उपचार घ्यावा असे आवाहन कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोटे यांनी कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मार्फत   कामठी पंचायत समिती सभागृहात  सर्पदंश बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
सर्पदंश झाल्यावर अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात तेव्हा सर्पदंशाने होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी कामठी तालुका आरोग्य विभाग तसेच वाईल्ड वेल्फेअर सोसायटी तर्फे कामठी पंचायत समिती सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत वाईल्ड लाईफ संस्थाचे नितीन भादकर व आकाश सोनटक्के यांनी  आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विषारी व विनविशारी  साप  कसे ओळखावे याचे संपूर्ण माहिती देण्यात आली.त्यांना विषारी सापाचा दंश झाल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम ,
लक्षणे आणि प्राथमिक उपचार बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली.तसेच सर्पदंश ची घटना घडल्यास सर्पमित्र नितेश भादरकर मो क्र 7972646909 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Popular Articles