नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी आंतराष्ट्रीय लोकशाही दिन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना लोकशाहीतील ‘अचिविंग जेन्डर इकव्हॅलिटी’ बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक बोरकर यांनी भूषविले तर कार्यशाळेला प्रमुख व्यक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांची उपस्थिती होती. आंतराष्ट्रीय लोकशाही दिन २०२५ चा विषय असलेल्या ‘अचिविंग जेन्डर इकव्हॅलिटी’ ला अनुसरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. लोकशाही ही लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता निर्माण करण्यात आलेली व्यवस्था आहे. स्वातंत्र्य, समता, स्वातंत्र्यता, न्याय, बंधुता आदी मूल्यांना लोकशाही जोडून ठेवते.
भारतात मत देण्याचा अधिकार २१ वरून १८ वर्ष करण्यात आले. मतदान करण्याची व्याप्ती विस्तृत करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा सरकार निवडण्याची समान संधी लोकशाही द्वारेच प्राप्त झालेली आहे. मात्र, ब्रिटिश काळात भारतातील काहीच निवडक लोकांना मतदान करण्याचा अधिकार होता, असे त्यांनी सांगितले. लोकशाहीचे तत्वे सांगताना लोकशाहीत निर्णय घ्यायचे असेल तर ते बोलता यायला पाहिजे. लोकशाहीत महिलांच्या समस्या महिलांना प्रस्ताव सादर करता यायला पाहिजे. स्वतः चा आवाज स्वतः उचलता यायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
लोकशाहीमुळे आपल्याला दर पाच वर्षात नवीन सरकार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ज्यामुळे समाजात बदल घडवून आणता येतो. लोकशाही बळकट करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला बोलावे लागेल, आपले विचार सांगावे लागेल, आपले मत दुसऱ्या समोर मांडता आले पाहिजे. एक स्वातंत्र्य मुक्त विचार मनामध्ये न ठेवता ते सादर करता येण्यासाठी लोकशाहीला फार महत्व आहे. आपण जे आज बोलू शकतो ते लोकशाही मुळेच शक्य झाले आहे, असे ते म्हणाले.
जगभरात २७ टक्केवारी महिलांची सत्तेत भागीदारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के, राजस्थान सरकारमध्ये ५० टक्के, विदेशात रावांडा येथे ६३.८ टक्के, क्यूबा ५६ टक्के, मॅक्सिको ५० टक्के, सौदी अमीरात २१ टक्के, इराक २८.९ टक्के अलझेरियाला २६.४ टक्के आहे. चौदा लाख पन्नास हजार महिलांना पंचायतराज व्यवस्थेत निर्णय प्रक्रियेत भाग घेता आला आहे.
लोकशाही जर समुदायात आणायची असेल तर ते सर्व प्रथम आपल्या घरापासून चालू करावे लागेल. तेव्हाच लोकशाहीचे महत्व समाजात बदलता येईल. अश्या विविध विषयावर प्रकाश घालून विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे देऊन समाधान करण्यात आले.
कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ. अशोक बोरकर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मुळेच मतदान करण्याचं स्वतंत्र मिळाले आहे, असे सांगितले. लोकशाही धर्म, जात, लिंग, पक्ष असल्या कुठल्याही प्रकारचे भेदभाव करीत नाही. विविध उदाहरणाद्वारे मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे संचालन प्रशंशा खांडेकर यांनी केले तर आभार प्रिन्स गणवीर यांनी मानले. कार्यशाळेला समाजशास्त्र ( समाजकार्य ) विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक डॉ. प्रियंका अंबादे, विलास सूर्यवंशी, तृप्ती गणवीर, डॉ. नितीन कायरकर, अमिता महातळे, डॉ. राजश्री कापसे डॉ. पुनम निमजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी देखील कार्यशाळेला उपस्थित होते.




