spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

AIAPGET-2026 साठी इंटर्नशिपची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढ

– NIMA Students Forum Maharashtra च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

मुंबई/नागपुर :-  NIMA Students Forum Maharashtra यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेच्या माध्यमातून AIAPGET-2026 परीक्षेसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31ऑगस्ट 2026 वरून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील 2020–21 BAMS, BHMS, BUMS बॅचच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कोविड-19 महामारीमुळे विलंबाने झाले होते. परिणामी त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकात बदल होऊन इंटर्नशिपही उशिरा पूर्ण होणार होती. त्यामुळे हजारो विद्यार्थी AIAPGET-2026 परीक्षेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.

विद्यार्थ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत NIMA Students Forum Maharashtra यांनी NCISM, आयुष मंत्रालय आणि NTA यांच्याकडे सातत्याने निवेदने सादर केली. तसेच NCISM चे Chairperson (डॉ.मनीषा कोठेकर) यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू प्रभावीपणे मांडण्यात आली. या सकारात्मक पाठपुराव्याची दखल घेत NCISM ने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून AIAPGET- 2026 साठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 10 हजाराहून अधिक तसेच देशभरातील 30 हजार पेक्षा जास्त BAMS, BUMS, BHMS विद्यार्थ्यांना AIAPGET- 2026 परीक्षेसाठी पात्रता मिळणार असून त्यांचे एक महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे. या विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेतृत्व व समन्वय NIMA Students Forum Maharashtra चे पदाधिकारी डॉ.संकेत अण्णाजी झाडे (अध्यक्ष-महाराष्ट्र), डॉ.कृष्णा चलागे (सचिव) आणि डॉ. योगेश उदगीकर (कोषाध्यक्ष) यांनी केले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घडवून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या संपूर्ण पाठपुराव्यात डॉ.आशुतोष कुलकर्णी (NIMA केंद्रीय अध्यक्ष), डॉ. टेंभुर्णीकर (माजी NIMA केंद्रीय अध्यक्ष), डॉ.राजू ताटेवार (NIMA महाराष्ट्र राज्य अध्यक्ष), डॉ.प्रशांत देशमुख (महासचिव), डॉ.सोपान खर्चे (कोशाध्यक्ष- निमा महाराष्ट्र), डॉ. गजानन पडघन (केंद्रीय उपाध्यक्ष), डॉ. शैलेश निकम (केंद्रीय उपाध्यक्ष), डॉ.रविंद्र बोथरा (नागपूर), डॉ.शैलेंद्र अग्रवाल (नागपूर), डॉ. सागर कारंडे आणि डॉ.श्रीराम रगड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि न्याय्य हक्कांसाठी भविष्यातही अशाच प्रकारे ठामपणे कार्यरत राहील. असे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.संकेत अण्णाजी झाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular Articles