उमरेड १४ : उमरेड शहरातील कावरापेठ येथील रहिवासी विशाल वसंता राऊत (वय 42) याने आज बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या अगोदर घराच्या छतावरील हुकला पांढऱ्या रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतक विशाल राऊत मागील काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होता. वारंवार उपचार करूनही वेदना कमी न झाल्याने आणि घरची परिस्थिती हालकी असल्यामुळे मोठा उपचार घेता न आल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. विशाल हा मजुरीचे काम करत होता.
आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतकाने मागे पत्नी आणि तीन मुलींना सोडले आहे. आज सकाळी शवविच्छेदनानंतर त्याचे अंत्यसंस्कार सायंकाळी 4 वाजता वेकोलीच्या आमनदी घाटावर करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मृतकाचा भाऊ सचिन राऊत यांनी उमरेड पोलिसांना दिली. त्यानुसार उमरेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.




