– नवरात्रोत्सवात यंदा धरती माता थीम नेहरू पार्कमध्ये रेणुका माता चे भव्य दर्शन
नागपूर :- टिळक पत्रकार भवन धंतोली मध्ये 18 सप्टेंबर रोजी, आयोजित केलेल्या पत्र परिषदेमध्ये नेहरू पार्क नवरात्र दुर्गा उत्सव मंडळातर्फे यंदा माहूर गडाची रेणुका माता यांचे भव्य दर्शन घडविण्यात येणार आहे. मंडळाचे हे पाचवे वर्ष असून शहरातील सर्वात आकर्षक आणि भव्य पंडाल उभारण्यात येणार आहे. शहरातील गजबजलेल्या इतवारी भागात शाही स्वरूपात होणाऱ्या या उत्सवात प्रथमच धरती माता थीम साकारण्यात येत आहे. आनंद इंगळे यांच्या कल्पक सजावटीमुळे पेंडाल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मंडळ आधीपासूनच नवनवीन संकल्पनांसाठी प्रसिद्ध असून यापूर्वी भवानी माता, तुळजाभवानी, सप्तशृंगी, कोल्हापूर महालक्ष्मी आदि थीमवर भव्य सजावट करण्यात आली होती. यंदा देखील मंडळाच्या वतीने माता आगमन सोहळा, गोंधळ, रासगरबा, भव्य महाआरती, अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत सौरभ श. महाजन यांनी पत्रकारांना दिली. रेणुका मातांच्या दर्शनासाठी नागपूर शहरातील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सौरभ महाजन यांनी केले. आयोजन समिती सौरभ महाजन, दिपक महाजन, देवेंद्र हरडे, सतीश महाजन, संजय महाजन, गजेंद्र पांडे, सांरग महाजन, सचिन सावकर, चेतन येनुरकर इत्यादीं या कार्यक्रमांसाठी परिश्रम घेत आहेत.



