spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन कामठीचे पहिले आमदार – नगराध्यक्ष अजय अग्रवाल

– बाबू हरदास एल एन जयंतीनिमित्त अभिवादन  

कामठी :- सन 1937 मध्ये मध्यप्रदेश विधिमंडळासाठी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्थापित  ‘स्वतंत्र मजूर पार्टी चे सात उमेदवार निवडुन आले होते ज्यात नागपूर कामठी निर्वाचन क्षेत्रातून जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन 2100 मतांनी निवडून आले होते त्यानुसार कामठी निर्वाचन क्षेत्राचे पहिले आमदार असल्याचा बहुमान आहे. बाबू हरदास एल एन यांचा जन्म 6 जानेवारी 1904 रोजी झाला असून त्यांची आठवण अजूनही स्मरणार्थ आहे असे मौलिक प्रतिपादन कामठी नगर परिषद चे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी आज 6 जानेवारीला कामठी येथील बाबू हरदास एल एन चौक स्थित बाबु हरदास एल एन यांच्या जयंती दिनानिमित्त सामूहिक अभिवादन प्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या हस्ते बाबू हरदास एल एन यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, दीपप्रज्वलन करून बुद्ध वंदना घेत सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष मंगेश यादव,राज हडोती, लाला खंडेलवाल,माजी नगरसेवक कपिल गायधने, सुनील पमनानी,आशुतोष अवस्थी, स्वयम यादव आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.