spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे आदर्श बाळगणे गरजेचे – एसीपी अंकुश खेडकर

कामठी :- पत्रकारिता ही सार्वजनिक जीवनाशी निगडीत असून सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असतात; परंतु याकडे दुर्लक्ष करून ज्या पत्रकारिता क्षेत्राने आपल्याला उभे केले त्या क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम केलेच पाहिजे. काळानुरूप विकासाच्या व्याख्या बदलत असतात. त्यामुळे आपणाला नक्की कोणत्या प्रकारचा विकास हवाय, याचे भान पत्रकारांनी ठेवण्याची गरज आहे. पत्रकारिता करत असताना बाळशास्त्री जांभेकरांचे आदर्श बाळगणे गरजेचे आहे. असे मौलिक प्रतिपादन कामठी पोलीस स्टेशन चे एसीपी अंकुश खेडकर यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात व्यक्त केले.

तर सोशल मीडियासह अन्य पर्यायी माध्यमांचे वाढलेले प्रस्थ, तंत्रज्ञानात होणारे बदल आणि त्या स्वीकारण्यातील अडचणी, वर्तमानपत्रांचे बिघडलेले आर्थिक गणित आदी सर्व बाबी पत्रकारितेत काम करणाऱ्याच्या जिव्हाळ्याच्या आहेत.असे मत नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी कामठी शहरातील पत्रकारांचा गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आला..

Popular Articles