नागपूर :- विकासात्मक पत्रकारितेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या कार्य कर्तृत्वाबद्दल रामोजी फाऊंडेशनच्या पहिल्याच प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित पत्रकार व ग्रामीण, कृषी समुदायाच्या उन्नतीसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते जयदीप हर्डीकर यांना लाभलेल्या या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन शनिवार ३ जानेवारी, २०२६ रोजी पंचशील चौकातील टिळक पत्रकार भवनाच्या पत्रकार परिषद सभागृहात सायंकाळी ६ वाजता. जयदीप हर्डीकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे यांच्या हस्ते हा सत्कार होणार असून प्रख्यात शेतकरी नेते विजय जावंघिया हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे याप्रसंगी भाष्य करतील. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे. अशी विनंती डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विजय सातोकर आणि रवींद्र रूक्मिणी पंढरीनाथ यांनी केली आहे.
जयदीप हर्डीकर यांना रामोजी फाऊंडेशनचा विकासात्मक पत्रकारितेचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार आज









