spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनता मेडिकल स्टोअर्स तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न

कन्हान :- परिसरातील नागरिकांना सुलभ व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जनता मेडिकल स्टोर्स गणेश नगर पांधन रोड कन्हान व्दारे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करून यशस्विरित्या पार पडले.

बुधवार (दि.७) जानेवारी २०२६ ला जनता मेडिकल स्टोर्स गणेश नगर पांधन रोड कन्हान व्दारे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर प्रमुख अतिथी रुशाबी विलास निकम, गायत्री श्याम पिपलवा, के. डी. बनकर, जोगन पानतावने तसेच सदस्य आंचल सिंग व कुशल डायरे आदीच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात करण्यात आले. शिबिरात महिलांच्या आरोग्याशी संबंधित आजारांवर विशेष भर देण्यात आला. अनियमित मासिक पाळी, कमी अथवा अधिक रक्तस्राव, पेल्विक वेदना, असामान्य योनीस्त्राव, गर्भधारणा, रजोनिवृत्ती (मेनोपॉज) संदर्भातील तक्रारींची तपासणी व मार्गदर्श न करण्यात आले. यासोबतच त्वचारोग, केस गळणे, अ‍ॅलर्जी, मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर सामान्य आजारांचीही तपासणी करण्यात आली. शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कविशा जादवानी, डॉ. तेजस्वी लाडी यांनी वैद्यकीय सेवा प्रदान केली. या मोफत आरोग्य शिबिरा चा लाभ महिला व पुरुष रुग्णांनी मोठ्या संख्येने उप स्थित राहुन लाभ घेतला. शिबिरात ३२ रुग्णांची बीएम डी (हाडांची घनता) तपासणी, २४ रुग्णांची रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी तसेच १७ रुग्णांची यूरिक अ‍ॅसिड तपासणी मोफत करण्यात आली. त्यामुळे नाग रिकांना वेळेत आपल्या आरोग्याची माहिती मिळण्यास मदत झाली. याप्रसंगी आयोजकांनी अशा प्रकारची सामाजिक आरोग्य शिबिरे भविष्यातही सातत्याने आयोजित करण्यात येतील असे सांगितले. शिबिर यशस्वितेकरिता सहकार्य करणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी वृंद आणि नागरिकांचे आयोजकांनी आभार व्यकत केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.