Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर जवाहरनगर पोलिसांची कारवाई; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा जवाहरनगर :- जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत जनावरांना क्रूर वागणूक देत त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २१,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ११ गोवंश जातीच्या बैलांची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुस्ताकीम मोवीन शेख (वय २३, रा. येडखेडा) आणि शोएब युनुस मोहम्मद (वय २०, रा. कामठी) या दोघांना अटक केली असून, नईम अलीम आणि अरविंद भजनलाल डहाट (रा.चंगेरा जिल्हा गोंदिया ) हे दोन आरोपी सध्या फरार आहेत. आरोपींनी त्यांच्या मालकीच्या अशोक लेलँड ट्रकमध्ये (क्र. MH 40 CM 0337) नियमांचे उल्लंघन करून ११ बैलांना अत्यंत निर्दयीपणे, दाटीवाटीने आणि अन्न-पाण्याविना कोंबले होते. जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी २x२ मीटर जागा असणे बंधनकारक असतानाही, आरोपींनी त्यांना दुखापत होईल अशा स्थितीत ठेवले होते. पोलिसांनी २० लाख रुपयांचा ट्रक आणि १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे बैल असा एकूण २१ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) नुसार गुन्हा क्रमांक २०३/२०२६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पो.नि. चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हाके व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. सध्या जवाहरनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com