कन्हान २१ : – केडीके कान्व्हेंट टेकाडी येथे भारतमातेचे थोर सुपुत्र व स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहा री वाजपेयी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे संचा लक अविनाश कांबळे यांच्या हस्ते दोन्ही विभुतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी बिरेंद्र सिंग, सुरेंद्र बूधे यांनी दोन्ही विभुतींच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्ग दर्शन केले. प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी विभुतीं च्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मनिषा कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेखा हिंगे यांनी केले. यावेळी किशोर वासाडे,कांबळे , लाखेश्वर वासाडे, विलास हूड, चक्रधर आखरे, भाऊ राव लेकुळवाले, अपर्णा गजभिये, रिना किशोर, अर्चना कारेमोरे सह पालक आणि विध्यार्थी उपस्थित होते.


