कामठी :- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत 21 एप्रिल पासून सुरू झालेल्या बेमुद्दत संपाला कामठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपात सहभाग नोंदविला आहे. कर्मचारी हिताच्या विविध प्रलंबित मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आला आहे.
कामठी तहसील कार्यालयातील कर्मचारी बेमुद्दत संपात सहभागी झाल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर होत आहे.कार्यालयात कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट असून नागरिकांची कामे रखडत आहेत, कार्यालयातील कामकाज ठप्प पडली आहेत. शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घेऊन तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संघटनेच्या वतीने यापूर्वीच शासनाला निवेदन देऊन सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची अधिसूचना तात्काळ निर्गमित करणे,सर्व कर्मचाऱ्यासाठी केशलेस आरोग्य सेवा लागू करणे,विभागीय सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करणे तसेच रिक्तपदे तातडीने भरणे,अश्या अनेक महत्वपूर्ण मागण्या मंडण्यात आल्या होत्या मात्र वारंवार सूचना देऊनही शासनाकडून कोणतेही ठोस कारवाही न केल्याने अखेर बेमुद्दत संपाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.या संपात कामठी तहसील कार्यालयातील माधुरी उईके ,माया गायकवाड, अर्चना गिरडकर,मिथिलेश कोल्हे,ज्योती डोरसेटवार,रेखा उंबरकर,किशोर दडमल,वैशाली मेश्राम, भुपेंद्र निमकर, निखिल शेंडे,नितीन टेंभुरने,आदींनी संपात सक्रिय सहभाग घेतला आहे.

