कन्हान, मारुती रहाटे ता. ३ : : – अखिल भारतीय मांगगारूडी दलित आदि वासी राष्ट्रीय संघटन व एम.जी.एस.स्पोर्टिंग शिक्षण संस्था नागपुर आणि अखिल भारतीय मांगगारुडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व विमुक्त समाजाचा स्वातंत्र्य दिना निमित्य १० वी १२ वी विद्यार्थ्यांचा आणि भुतपु र्व सैनिकांचा भव्य सत्कार करून समाजाच्या उन्नती करिता मार्गदर्शन करून भटक्या-अर्धभटक्या समाजा चा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहाने संपन्न झाला.
रविवार (दि.३१) ऑगस्ट २०२५ ला ए.पी.सेल्स, गणेश नगर कन्हान येथे ३१ ऑगस्ट घुमतू अर्थ घुमतू समाज स्वतंत्र दिवसा निमित्य १० वी १२ वी विद्यार्थ्यां चा आणि भुतपुर्व सैनिक यांचा भव्य सत्कार कार्यक्रम समाजाचे जेष्ट मा. बृजलाल गायकवाड (वर्धा) यांचे अध्यक्षेत तर उध्दघाटक मा. रविंद्र तांडेकर (कामठी) यांचे हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते मा. शांताराम जळते, शैलेश खोब्रागडे, प्रमुख अतिथीं पत्रकार कमलसिंह यादव, नंदकिशोर गजभि ये, कुमार हातागडे (वर्धा), डॉ. सुंदरलाल पाटील, रघुनाथ पात्रे, गणेश पावर, सुनील मेश्राम, जगदीश पावर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शतकानुशतके उपेक्षा, अन्याय आणि सामाजिक अवहेलनांच्या जख मा सोसणा-या भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासना तर्फे विविध योजना राबविल्या जातात. यानंतरही हा समाज अजुनही विकासापासुन कोसो दूर असल्याचे वास्तव आहे. ३१ ऑगस्ट हा दिन भटके-विमुक्त दिवस म्हणुन साजरा केला जातो. गाव कुसाबाहेर असलेल्या त्यांच्या अंधा-या झोपडीत विका साचा दिवा केव्हा पेटणार ? असा प्रश्न या दिनाच्या निमित्याने प्रमुख वक्त्यानी उपस्थित केला.
समाजाचा स्वातंत्र्य दिन सोहळयात १०वी व १२ वी च्या ३५ विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच माजी सैनि कांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला . समाजाकरिता निरंतर झटणारे मा. नेवालाल पात्रे यांनी प्रास्ताविकातुन ३१ ऑगस्ट चे महत्व व समाजा च्या प्रगतीकरिता एकत्री पणे संघर्ष केल्यास आपणास कोणीही अडवु शकणार नाही. यास्तव समाजाला एक संघ राहणे गरजे असल्याचे संबोधित केले. संचालन दिगांबर हारगुडे यांनी आभार सुनिताताई पात्रे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजक अनिल भालेकर, मनोज खंडारे, कीमत पात्रे, रामाजी पात्रे, सुमित पुरवले, महेंद्र खडसे, रॉबिन निकोसे, सन्नी पात्रे, भूरा पात्रे, महेंद्र शेंडे, सतीश नाडे, चिराल वैद्य, किशोर शेंडे, अर्जुन पात्रे, कुमार हातागडे, नितिन मेश्राम आदी अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजाच्या योगदानाचा गौरव
क्त्यांनी आपल्या भाषणात भटके-विमुक्त समाजाने स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या योगदानाचा गौरव केला. सन १८७१ मध्ये लागु करण्यात आलेल्या “गुन्हेगार कायद्यामुळे” या समाजावर अन्याय झाला होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि तत्काली न पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रयत्नातुन १९५२ मध्ये समाजाची त्या काळ्या कायद्यातुन मुक्तता झाली . आजही या समाजाबद्दल अनेक गैरसमज समाजात आहेत. त्या विषयांवर चर्चा व्हावी आणि भविष्यात समाजाला न्याय, समानता व सन्मान मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.


