सुरज बंडीवार: पांढरकवडा :- विदर्भ आणि मराठवाडा तसेच तेलंगणातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धस्थान असलेल्या केळापूरच्या जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आईच्या आरतीसाठी भाविकांची लकी ड्रॉ द्वारे निवड केली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया देवस्थानतर्फे सुरू करण्यात आली आहे. जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या उत्सवामध्ये जगदंबेची सकाळ व संध्याकाळची आरती करणाऱ्या भाविकांची निवड दरवर्षीप्रमाणे यंदाही लकी ड्रॉ द्वारे केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवामध्ये श्री जगदंबेची अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यामध्येही भाविकांनी मोठ्या प्रमणात सहभाग घेण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात आपल्या नावाने अखंड मनोकामना ज्योतमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थानचे अशोक बेतवार व सुनील बावने यांच्याशी संपर्क करण्याचे
आवाहन संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे, उपाध्यक्ष काशिनाथ शिंदे, सचिव चंद्रशेखर पोलाडीवार, कोषाध्यक्ष प्रेमराव वखरे, सहसचिव वामन सिडाम, विश्वस्त दीपक कापर्तीवार, अण्णासाहेब पारवेकर यांनी केले आहे. आरती करणाऱ्या भाविकांची निवड करण्याचा ड्रॉ गुरुवारी दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता काढण्यात येणार आहे.




