किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील सीमेवरील पारशिवनी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खंडाळा (घटाटे) येथे परमात्मा एक सेवक मंडळाचे सदस्यांच्या इथे परमपूज्य बाबा जुमदेवजी यांच्या हवन असल्यास, सेवकांच्या कुटुंबातील जि प शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांच्या आग्रहास्तव हवनासाठी सुट्टीच्या लेखी अर्ज शाळेत देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी मिळत असल्याच्या प्रकार आज बुधवार (ता. 9 सप्टेंबर)ला गावात वृत्तपत्र वाटत असताना दिसून आला.
याबाबत शाळेतील मुख्याध्यापिका सुरेखा दूधे यांना विचारपूस केले असता, याच गावात नव्हे तर परिसरातील गावातही हवनासाठी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शाळेत हजेरी लावल्यानंतर व दुपारी साडेबारा नंतर सुट्टी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात सुट्टे असते, त्यात आता हवनाची पण सुट्टी परमपूज्य जुमदेवजी बाबांच्या सेवकाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळत असल्याने, विद्यार्थ्यांच्या आनंद गगनात मावेनाचा होतो. रस्त्यावरून हवनाला जात असताना, विद्यार्थ्यांना विचारपूस केली असता त्यांनी बाबांचे सेवक राजेंद्र मनघटे यांच्या घरी हवनाला जात असल्याचे मोठ्या आनंदाने सांगितले.





