spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिक्षणमंत्र्यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

– सालईराणीची ‘ आकांक्षा ‘ राज्यात आठवी

बेला :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्र राज्याचे गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत मानाचे स्थान मिळवणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांचा गौरव शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे हस्ते नुकताच नागपूर येथे करण्यात आला.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बेला गावाजवळच्या सालईराणी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेची आकांक्षा श्रीकृष्ण पुरके ही विद्यार्थिनी राज्यातून आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. याशिवाय, त्याच शाळेचा शौर्य नितीन आत्राम, बेला येथील जि प प्राथमीक शाळेची श्रावणी पवन लांडे आणि कवडापूर येथील लोकजीवन आदिवासी प्राथमिक शाळेचा आर्यन प्रकाश कतलाम यांनी सुद्धा चमकदार कामगिरी करून गुणवत्ता यादीत दहाव्या क्रमांकावर उल्लेखनीय यश प्राप्त केले. त्याबद्दल बेला ग्रामीण भागात या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकतात.याचे हे एक उच्चतम उदाहरण आहे. असे मनोगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सालईराणी शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता कुर्झडकर यांनी व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.