कुही :- हदद्दीतील अवैधरीत्या विनापरवाना रेती चोरी करणाऱ्या तसेच अवैध दारू व्यवसायात सकिय आरोपीस यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) अन्वये उपविभागिय दंडाधिकारी, उमरेड यांनी हद्दपार केले.
सराईत गुन्हेगार नामे १) तुषार बारसु नेवारे, वय २५ वर्ष, रा. सुरगाव ता. उमरेड, जि. नागपुर याचेवर अवैध रित्या विनापरवाना रेती चोरीचे गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपी असे गुन्हे करण्याच्या सवयीचा असुन तो असे गुन्हे करून शासनाचा महसुल बुडवतो. तसेच आरोपी कं २) महिला आरोपी हिचेवर अवैधरीत्या दारू खरेदी विक्रीचे गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परीसारातील अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे. पोलीसांनी आरोपीताचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी पोलीसांनी त्यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी यांनी आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली.